'वय,लग्न आणि वया अंती लग्न' हे झालेच पाहिजे अशी चर्चा होतच असते.नित्य वेग-वेगळ्या वर -वधूच्या स्थळाची बातमी आल्यावर ह्या गोष्टींची चर्चा तुमच्या घरी सुद्धा रंगायला सुरुवात झाली का?
ह्या सर्व गप्पां मध्ये तुमची तळमळ फक्त एकच असेल, "आता हे काय नवीन?", "कोण असेल ज्याच्या बरोबर आयुष्य फुलणार आहे?", "आत्ता तर कुठे थोडा एकांत मिळाला.", " आत्ताच नाही करायचं मला लग्न.", "लग्न करणं इतकं महत्वाचं आहे काय ?" किंवा "मी एकट्याने नाही का राहू शकत?". असे अनेक प्रश्न पाण्यावर येण्याऱ्या लाटां सारखे कुठल्या ही निष्कर्षावर न पोहोचता तुमच्या मनात फुटत असतील. ही तळमळही बरोबरच आहे कारण हा आयुष्याचा मोठ्ठा निर्णय आहे, पण काळजी करू नका. आपल्या प्रश्नांना थोड विराम द्या...... लग्न हे कुठल्या ही निष्कर्षाला पटकन पोहोचण्या सारखा विषय नाही . हे तर ह्याला अनुभवून आनंदाने चघळण्या सारखी खडी साखर आहे. ज्याचं महत्व आणि आनंद हळू हळू मिळण्याऱ्या रसानेच कळते . आई-वडील, आप्त-इष्ट, भाऊ-बहिणी, ह्यांची साथ आयुष्यात नेहमीच असते पण कोणीतरी फक्त तुम्हाला समजून घेणारा , तुमच्या एकांतात तुमचा सोबती होण्यासाठी किंव्हा मनात चालणाऱ्या प्रश्नांचे समाधान करून देणारा , कोणीतरी आपल्या जवळ चा,आपल्या मनाच्या खोलात शिरू शकणारा सोबती, हा प्रत्येकाला लागतोच. म्हणून ह्या आयुष्याच्या गाडीला दोन चाक असणे गरजेचे . "एक से भले दो".
आयुष्यभर कोणतीही अट न घालता एकमेकांना साथ देऊन पूर्ण समर्पण भावाने एकरूप होणं हे लग्नाचं महत्व, हे नातं नवरा आणि बायको म्हणूनच फक्त ओळखले जात नाही तर मनात कुठलाही प्रश्न आणि शंका न ठेवून ह्याला कुटुंबाची ओळख बनवणे हे ह्याचे नियम कायदे. ह्या सर्व नियमांना समजून ,एक दुसऱ्याचे सोबती बनून आयुष्य जगताना जेव्हां तुम्हाला आपल्या नातलगांकडून प्रेमाचा पाठिंबा मिळेल तेच तुमचे साफल्य मग असे असताना ,असा लग्नाच्या रिपोर्ट कार्ड मध्ये मिळणारा १०० टक्क्यांचा आनंद तुम्ही पण एकदा घेउन तर बघा, आणि तुमच्या अपेक्षे प्रमाणे स्थळ शोधण्या साठी "केदार कनेक्शन्स " आहेच ह्या प्रवासात नेहमी तुमचा सोबती म्हणून.
तुमच्यासमोरची प्रश्नचिन्ह दूर सारून एक स्पष्ट भूमिका व त्यासाठी आवश्यक प्रक्रिया सोपी करून देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.तर मग लग्नासाठी होकार नक्की कळवा.