जग आनंदी होते.भेटी-गाठी,सोहळे, प्रवास करणे, सर्व काही व्यवस्थित चालू होते.-आणि मग आला कोविड!
कोविडने केवळ अनेकांना संक्रमितच केले नाही तर जगभरातील लाखो लोकांच्या हृदयावर आणि मनांवर परिणाम झाला. वयस्कर,आणि लहान मुलां सोबतच, वयोगट २० व ३० च्या दरम्यानची तरुण पिढी, जे नवीन नातेसंबंध, प्रवास आणि गाठी-भेटीसाठी च्या तयारीत होते त्यांना हे करता येत नसल्यामुळे भरपूर त्रास सहन करावा लागला
व्हायरल संसर्गामुळे प्रवासामध्ये आणि वैयक्तिक भेटींवरील निर्बंधांनी जगभरातील संबंधांची गतिशीलता बदलली. या सक्तीमुळे सामाजिक गतिशीलता, ज्यात लोक संवाद साधतात त्याचे काही सकारात्मक तसेच काही नकारात्मक परिणाम येणे स्वाभाविकच होते . अधिक सकारात्मक नोटवर, काही अभ्यासांमध्ये असे आढळून आले की गेले वर्षभर कोविड-परिस्थितीमुळे समाजा पासून लांब राहण्याचा परिणाम म्हणून, मुले दीर्घकालीन संबंधा बद्दल गंभीरपणे विचार करू लागली. आणि अशा प्रकारे ते ज्या लोकांना भेटत होते किंवा बोलत होते त्यांची संख्या नाही तर लोकांची गुणवत्ता त्यांच्या साठी अधिक महत्वपूर्ण होती .लोकांच्या गुणवत्तेला अधिक महत्व देण्याची ही जाणीव, कमी लोकांना भेटू शकल्यामुळे झाली आणि जीवनाबद्दल आत्मपरीक्षण करण्यात जास्त वेळ घालवता आला. आणखी एक परिणाम म्हणजे बाह्य सौंदर्यापेक्षा चारित्र्याचे वाढते महत्त्व. घरापासून लांब राहण्याऱ्या अनेक तरुण भारतीयांना शिकवले आहे की बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक गुणांना महत्त्व देणे आवश्यक आहे - केदार ने एका दशकापूर्वी त्याच्या स्थापनेपासूनच गुणवत्तेवर अधिक विश्वास ठेवला होता.
दुसरा परिणाम म्हणजे स्पष्ट संवादावर लक्ष केंद्रित करणे,अपेक्षां-भोवती केंद्रित संभाषणे आणि नातेसंबंधातून लोकांना नेमके काय हवे आहे?प्रत्यक्ष प्रक्रियेकडे जाताना, आणखी एक चिंता कौटुंबिक मेळाव्याच्या भोवती असते.भारतीय विवाह प्रक्रियेचा हा एक मोठा भाग असतो.जोडप्यांचे लग्न होण्यापूर्वी भारतीय कुटुंबे नेहमी एकमेकांना जाणून घ्यायचा पूर्ण प्रयत्न करतात . भारतात असा विश्वास आहे की लग्न हे जेवढेजोडप्याचे महत्वाचे तेवढेच ते कुटुंबां करिता ही महत्वाचे आहे ! यासाठी अनेक कुटुंबांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे ऑनलाइन भेटण्याचा संकल्प केला . केवळ तरुणच नाही तर कोविडने जुन्या पिढीलाही तंत्रज्ञानाची जाण ठेवण्यास भाग पाडले आहे! अगदी लहान शहरांमधील पालकांनीही सेल फोन, ऑनलाइन प्लॅटफॉर्म आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर आता स्वीकारला आहे.
.या व्यतिरिक्त, देशभरातील विविध मॅचमेकिंग संस्थां द्वारे आयोजित केलेल्या मेळाव्याच्या कार्यक्रमां मध्ये एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे एकमेकांना जाणून घेण्याकडे लक्ष केंद्रित केले गेले आहे.एकमेव मुद्दा असा आहे की यापैकी कोणत्याही प्लॅटफॉर्मवर लोकांच्या गुणवत्तेबद्दल हमी क्वचितच आढळते - केदारला नेहमीच त्याच्या सदस्यांना असे आश्वासन देताना अभिमान वाटतो!
ते भाग्यवान आहेत जे कोविडच्या आधी एकमेकांशी परिचित झाले होते किंवा कोविड दरम्यान लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, त्यांनी सध्याच्या नवीन सामाजिक परिस्थितीनुसार जुळवून घेतले आहे.
एकूण वस्तुस्थिती पाहता भारतीय विवाह, जेथे आपण सहजपणे 1000 लोकांना आमंत्रित करतो , तेथे त्यांची संख्या कमी करून काही शेकड्यात मर्यादित केली आहे, तर पाच दिवसांचे समारंभ कमी करून दोन दिवसांचे केले आहेत. ज्यांना उत्सवांमध्ये तडजोड करायची नाही, त्यांनी त्यांचे विवाह पुढील वर्षी ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
या महामारीच्या काळात केदारने त्याच्या सदस्यांसाठी सेवेची गुणवत्ता कशी वाढविली ?
एक तर, केदार पूर्णपणे एका ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर स्थलांतरित झाला आहे जो त्याच्या सदस्यांना जागतिक स्तरावर प्रवेश प्रदान करतो. त्याच्या सर्व सशुल्क सदस्यांना अमर्यादित चॅटिंग आणि मेसेजिंग सेवा प्रदान करतो. दुसरे म्हणजे, त्याने त्याच्या ब्लॉगद्वारे दिलेल्या योगदाना मुळे त्याच्या सदस्यांच्या समुदायाला विविध विषयांवर जागरूकता व ज्ञानवर्धक माहिती, मराठी व इंग्रजी अश्या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे
पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, परंपरे प्रमाणे, केदारच्या व्यासपीठावर येणाऱ्या व्यक्तींच्या गुणवत्तेवर केदारचा एकमेव फोकस असल्याने आमच्याशी संबंधित तरुण आणि वयस्कर दोघांनाही दिलासा देणारा ठरला आहे.
आम्ही ते कसे पूर्ण केले? -इतर अनेक गोष्टींबरोबरच, केवळ सुशिक्षित आणि व्यावसायिकदृष्ट्या पात्र व्यक्तींना हे व्यासपीठ प्रदान करण्याच्या आमच्या एकमेव वचनबद्धतेने मदत केली आहे.दुसरे म्हणजे, आमच्या सदस्यांसाठी आमची वैयक्तिकृत सेवा, केदारच्या व्यासपीठावर येणाऱ्या लोकांची गुणवत्ता तपासण्यासाठी सर्व सदस्य-प्रोफाइलची वैयक्तिकरित्या तपासणी आणि पडताळणी केली जाते. यामुळे केवळ फसवणूकीला आळा बसला नाही तर आमच्या सर्व वर्तमान आणि भविष्यातील सदस्यांना मानसिक शांती प्रदान केली आहे, कारण केदार त्याच्या व्यासपीठावर गुणवत्तेची खात्री करत आहे.
लवकरच, केदार आपल्या सदस्यांना भविष्यात व्हिडीओ चॅटिंगची शक्यता आणि तात्काळ भविष्यात ऑनलाइन अॅपद्वारे संवाद साधण्याची क्षमता प्रदान करेल. तर संपर्कात रहा,भेटत रहा आणि निरोगी रहा ……….