ज्योतिष मालिका - भाग 4 - तृतीय स्थानातील मंगळ

Published Date : January 18, 2022

आत्तापर्यंत आपण मंगळाची पहिल्या आणि दुसर्‍या स्थानातील फळे बघितली. आज आपण मंगळाची तृतीय स्थानातील फळे बघणार आहोत. तृतीय स्थान हे बहीण-भाऊ, नातेवाईक, पराक्रम, क्षमता, प्रयत्न, इच्छाशक्ती, दृढनिश्चय यांचा कारक आहे. कुंडलीत तृतीय स्थानी मंगळ असल्यास ती मंगळदोषाची कुंडली मानत नाहीत. या स्थानातील मंगळ हा जुळ्या संततीसाठी, आणि विशेषतः भावासाठी अनिष्ट ठरतो. हा मंगळ जवळच्या नातेवाईकांशी मतभेद दर्शवतो. या स्थानात असलेल्या मंगळामुळे जातक पराक्रमी, उत्साही, धाडसी, आदर्शवादी, दृढनिश्चयी असतो. जातकाने आपला अनिर्बंध आणि अनियंत्रित व्यवहार थांबवला नाही, तर जातकाचेच नुकसान होण्याचा संभव असतो. या स्थानी मंगळ असणारा जातक आपल्या राहत्या घरापासून काही ना काही कारणाने दूर जाण्याची शक्यता असते.

तृतीय स्थान हे चतुर्थाचे व्ययस्थान (12वे स्थान) असल्यामुळे जातक कुटुंबसौख्यासाठी आणि कौटुंबिक विवंचनांमुळे चिंताग्रस्त राहतो. मात्र, बर्‍याचदा या चिंता आणि विवंचना त्याच्या स्वातंत्र्याच्या अट्टाहासापोटी किंवा वर्चस्व गाजवण्याच्या स्वभावामुळे आणि त्याच्या वृथा अभिमानामुळेच उत्पन्न झालेल्या असतात.

या स्थानातील अशुभ मंगळ कानाचे आणि घशाचे विकार, बहिरेपणा देऊ शकतो. असा मंगळ जातकाला अविचारी, अहंकारी बनवतो. त्याच्यात अति आत्मविश्वास (overconfidence) असू शकतो.

या स्थानातील शुभ मंगळ व्यक्तीला प्रशासकीय गुण देतो, आणि त्याला निडर बनवतो.

सर्वसामान्यपणे हे स्थान मंगळासाठी पोषक स्थान आहे. मंगळाच्या अंगभूत गुणांना येथे वाव मिळतो.

 

केदार येथे आपण मंगळावर लिहिणे सुरू ठेवतो, कारण मराठी विवाहसोहळ्यांमध्ये तो खूप चर्चेचा विषय झाला आहे. मराठी मॅट्रिमोनी वेबसाइट्सवर ऑनलाइन संबोधित न केल्यामुळे हा विषय संबोधित करणे अधिक महत्त्वाचे आहे. आम्ही आमच्या मासिक ब्लॉग लेखनासह आमच्या सदस्यांमध्ये मूल्य जोडत राहण्याची आशा करतो.तुमच्याकडे काही विशिष्ट सूचना असल्यास नक्कीच वापरण्यासाठी संपर्क साधा.

Team Kedar