भारतात आज सामान्यतः लग्ना च्या वयात झालेली वाढ ,एक शोध / समाधान
गेल्या १० वर्षात पाहता-पाहता मुला -मुलींचे २०-२५ ते अधिकाधिक २८-३० पर्यंत होणारे लग्ना चे वय आज अगदी सहजपणे २८-३० पासून अगदी ३५ पर्यंत येऊन ठेपले . काही परिवारां करिता हा अत्यंत चिंते चा विषय असल्याने, ह्याची चर्चा वारंवार पालक आणि केदार च्या सदस्यांना बरोबर साहजिकच होते ,त्यातून निघालेला निष्कर्ष आपल्या समोर मांडण्याचा हा एक प्रयास . हे वाचल्या नंतर नक्कीच पालकांची काळजी दूर केल्याचं समाधान लाभेल . केदार चे सदस्य असलेले व इतर तरुण-तरुणीं बरोबर झालेल्या चर्चेतून असे समजले कि ,पूर्वी कसे ,शिक्षण,नोकरी नंतर लगेच लग्न हि प्राथमिकता आज बदलली आहे काळा ची गरज पाहता त्याचबरोबरआज करियर ,बिझिनेस ची महत्वाकांक्षा ,शैक्षणिक आकांशा जीवनशैली ,परदेश गमन आणि इतर हि जोडले गेलेत . आता तरुण-तरुणींना विवाहापूर्वी एकमेकांना जाणून घेण्याकरिता वारंवार स्वतंत्रपणे बोलणे -भेटणे सुधा गरजेचे वाटते .
या बदलत्या गतिशील युगात योग्य जोडीदारास शोधणे हे एक प्रकारचे आव्हानच आहे . केदार मध्ये आम्ही लग्न करणार्या संबंधितां करिता काही सामान्य थीम शोधल्या आहेत. आम्ही तरुण पिढीशी सोयीस्कर पणे केलेल्या संभाषणातून त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयन्त केला, त्यानुसार काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेणे गरजेचे वाटते 1) लग्नाच्या आधी एकमेकांच्या अपेक्षा समजून घेण्यास वेळ देणे 2) एकमेकांच्या कुटुंबांना जाणून घेणे हि तितकेच महत्वाचे 3) आयुष्याला व स्वतःला अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न 4) प्रवास आणि करियरची महत्वाकांक्षा.
केदार आता आपल्या अशा अनेक समस्यांबाबत थोडक्यात बोलण्यासाठी मासिक ब्लॉग सुरू करीत आहे. आम्हाला आशा आहे की यामुळे आमच्या वाचकां च्या मनातील शंकांचे समाधान होईल आणि लग्नांच्या संधर्भात असलेल्या समस्यांबद्दल समजून घेणे अधिक सोपे होईल.केदारच्या ब्लॉगवर अशेच भरपूर लेख आपल्या भेटीस येणार आहे . जर आपल्याला काही विशिष्ट विषयांबद्दल बोलण्याची इच्छा असेल तर कृपया आम्हाला अवश्य कळवा आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयन्त्न नक्की करू