लग्ना आधी काही महत्वपूर्ण मुद्द्यांवर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी चर्चा करणे आवश्यक आहे - केदार कनेक्शन
लग्न ही एक मोठी आणि जीवन बदलणारी घटना आहे. लग्न हा आपल्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट आहे. प्रत्येकजण सुखी वैवाहिक जीवनाची अपेक्षा करतो हेच साध्य करण्याकरिता खूप कष्ट, एकमेकांच्या प्रति निस्वार्थ प्रेम ,समर्पण, त्याग, जुळवून घेणे, तडजोड ,विश्वास आणि बरेच काही आवश्यक आहे. फक्त दोन व्यक्तींबरोबरच , यात दोन कुटुंबांचाही समावेश आहे. परिणामी, विवाह करण्याआधी सर्व दृष्टी ने सारासार विचार करणे आवश्यक आहे.
सध्याच्या पिढीने लग्न करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या सहा मुद्द्यां वर चर्चा येथे आहेत.
आर्थिक
आर्थिक व्यवहारांवर मोकळेपणाने बोलून आर्थिक अविश्वासूपणा टाळता येतो. तुमचे खर्च आणि बचत ह्या वर काय मत आहे?खाती आपण कशी ठेवावी ? वैयक्तिक , संयुक्त अथवा दोन्ही ? तुमची आर्थिक उद्दिष्टे काय आहेत? हे संभाषण तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये पारदर्शकता राखण्यात आणि तुमचा जोडीदार कोणत्या प्रकारच्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यास किंवा सामायिक करण्यास तयार आहे हे निर्धारित करण्यात मदत करेल.
धर्म आणि मूल्ये
विवाहावर धर्म किंवा जीवनपद्धतीचा अधिक प्रभाव पडतो आणि बहुतेक जोडप्यांना ह्याची जाण असते बऱ्याच लोकांची मूलभूत धार्मिक मूल्यांकडे बघण्याची दृष्टी वेगवेगळी असू शकते, म्हणून, तुमच्या धार्मिक मूल्यांवर आणि श्रद्धांवर चर्चा करा. ते तुमच्या सामायिक अस्तित्वावर परिणाम करू शकतात. तुमच्या मुलांना तुमच्या धर्म /संस्कारा प्रमाणे वाढविले जाईल का ? जरी तुमच्या दैनंदिन जीवनावर तुमच्या मूल्यांचा सध्या फारसा प्रभाव नसला तरीही, तुम्ही यासह एकमत आहात याची तुम्हाला खात्री असणे आवश्यकच आहे.
मुले(kids)
जोडप्याने पालकत्वाविषयीची त्यांची मूल्ये आणि कल्पनांबद्दल प्रामाणिक चर्चा करणे महत्वाचे आहे. लग्न करण्याआधी, तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला मुलं हवी आहेत की नाही आणि असेल तर किती, हे ठरवावं लागेल. तुमच्या मुलांचे संगोपन करण्याच्याबाबतीत चर्चा करणे गरजेचे वाटते या विषयांमध्ये, समान दृष्टिकोन असणे महत्वाचे आहे. तसे न केल्यास, तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो.
घर सांभाळणे
काळानुसार हा एक महत्वाचा विषय आहे ज्यावर चर्चा आवश्यक वाटते ज्यामुळे वारंवार मतभेद आणि गोंधळ टाळले जाऊ शकतात परंपरेने स्त्रियांनी घरातील कर्तव्ये सांभाळणे अपेक्षित होते तर पुरुष कामावर जायचे परंतु अधिकाधिक महिला नोकरी/व्यवसाया मध्ये प्रवेश करत असल्याने हे बदलत आहे. परिणामी, घरातील कामांची योग्य प्रकारे विभागणी करणे महत्त्वाचे आहे. याचा मागोवा घेण्यासाठी, कॅलेंडर किंवा वेळापत्रक तयार करा. खालील जबाबदाऱ्यांचा विचार करा: महिन्याचे लागणारे आवश्यक वाण - सामान व इतर आवश्यक वस्तू, स्वयंपाक , जेवण तयार करणे, स्वच्छता, आदि वर विस्तृत चर्चा पुढील वादविवाद टाळू शकतात
बाह्य कार्यक्षेत्र आणि घर ह्या मधले संतुलन
तुमच्या नोकरी/व्यवसायाचे स्वरूप कसे आहे ? ह्यावर संतुलन निर्भर करेल म्हणजे आपले कामाचे तास आणि वेळ निश्चित आहे का व ते बदलणारे असणार आहे का ?तुमचा वैयक्तिक आणि सोबत चा वेळ कसा घालविणे तुम्हाला जमणार आहे ? तसेच सामाजिक जवाबदाऱ्यांना देखील वेळ देणे ह्या सर्वावर आधीच सहमती असेल तरच आयुष्य कसे सुंदर होऊ शकेल
केदार कनेक्शन्स नात्यांबद्दल अधिक उत्प्रेरक विचारांसह लवकरच भेटीला परत येईल आणि आनंदी वैवाहिक जीवन निर्माण करण्यासाठी उपयोगी सूत्रांना घेऊन आपल्या सेवेत हजार होईल आपल्याला आमचा हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा करतो