लिव-इन रिलेशनशिप....'केदार' चा दृष्टीकोण

Published Date : July 06, 2021

  पारंपारिक आणि आधुनिक विचारधारा आज सोबत मिळून नवीन समाजाचा पाया मजबूत करत आहे आणि त्यातून होणारे बदल तरुणांसाठी नावीन्यपूर्ण आणि ज्येष्ठांसाठी आव्हानात्मक आहेत. अश्या बदलेल्या काळातील तरुण पिढ़ी ह्यात आपल्या उत्साहाची भर टाकून ह्या नूतन,आधुनिक स्वतंत्र समाजाला आपल्या चातुर्य समजदारीने प्रगतिशील बनवण्यात उत्साहाने सहभागी झाली आहे.
आधुनिक काळात विकासाच्या प्रभावामुळे प्रत्येक वर्ग आणि पिढी आपल्या हक्का साठी जागरूक झाली आहे आणि अश्या वातावरणात तंत्रज्ञान अवगत असलेले आजचे तरुण-तरूणी आयुष्यात यशाचं शिखर गाठत आहेत आणि ह्यात काही शंकाच नाही की ह्यात फक्त त्यांची मेहनत, तल्लख बुद्धि आणि नूतन विचार त्यांना मदत करतात पण जेव्हां प्रश्न लग्न करून नवे नाते संबंध जोडायचा येतो  तेव्हां त्यांची ही आधुनिक विचारधारा पालकांच्या मनात महत्वाचा आणि अप्रत्याशित प्रश्न निर्माण करते की प्रगती आणि काळाची गरज म्हणून बदललेल्या ह्या समाजात कुठे तरी आपल्या परंपरा आणि पूर्वापार जपलेली वैदिक संस्कृती  दूषित तर होत नाहीय ना? आणि असे अनेक प्रश्न निर्माण होणं साहजिकच आहे कारण  नातेवाईकांचा गोंधळ टाळून, आपल्या पसंतीनं निवडलेल्या जोडीदारासोबत लग्न करता रहाणं हा त्यांना परवडणारा पर्याय वाटू लागणे हे आपल्यासमोर मोठा प्रश्न घेऊन उभं आहे,ज्याला 'लिव-इन-रिलेशन' अश्या नावाने ओळखल जातं. कुठल्याही नात्याची अड़चण बाळगता आपलं एक स्वतंत्र जग असावं ज्यात राजा-राणी शिवाय कुणाचीच अडचण नसावी. पण ह्या पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली समाज नीटपणे टिकवून धरणं आणि उन्नत बनवणं शक्य आहे का? एकीकडे भारतात किंवा काही पाश्चात्य देशांमध्ये सुद्धा लग्न केवळ नातेवाईकांसोबत मौजमज्जा करणे आणि उत्सव साजरा करणे इतपतच मर्यादित नाही, तर लग्नाच्या सोहळ्यात मिसळणारे नवीन विचार आणि जुने अनुभव एकरूप होऊन नवीन समाज निर्माण करण्यास यत्नशील असतात, परंतु दुसऱ्या बाजूला आजची युवा पिढी ह्या वैशिष्ट्यपूर्ण संबंध आणि आजीवन वचनबद्धतेत गुंतून राहू इच्छित नाही. एक मोकळं,आणि ह्या नात्याशी निगडीत असलेल्या संबंधाची ओढ...

तरुणांच्या मानसिकतेत परिस्थितीनुसार वारंवार होणारे बदल भारतीय लग्न परंपरेसाठी निरनिराळे प्रश्न उत्पन्न करणं स्वाभाविकच आहे परंतु आपल्या परंपरा, आपली विवाह संस्कृति आज वर्षानुवर्षे एका भक्कम आधारावर लग्न परंपरा टिकविण्यास समर्थ ठरली आहे.कारण उत्तम समाज आणि उत्तम संतती घडविण्यासाठी ती आवश्यक आहे.आजची तरुण पिढी सुविज्ञ आहे.आपल्या वेद-पुराणांमध्ये वर्णित विविध प्रतीकात्मक कथांच्या मागचे विज्ञान  त्याच्या पर्यंत पोहोचले तर ते नक्की विचार करतील.

मोठ्या जागतिक पातळी वर आज 'केदार'च्या  मराठी मॅट्रिमोनी वरून सुयोग्य सुशिक्षित  मुला-मुलींची योग्य निवड करण्या करिता  'केदार'त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहे जेथून ते विचारपूर्वक योग्य निर्णय घेऊ शकतील .   कोणी कोणत्या प्रकारचे नाते निवडतात - हा निर्णय सर्वस्वी त्यांच्यावर अवलंबून आहे.

Team Kedar