शतकानुशतके स्त्रीची भूमिका घराच्या चार भिंतीत बंदिस्त होती. कुटुंब वाढविण्याचे काम जितके महत्त्वाचे आहे तितकेच अर्थार्जनाचे देखील आहे. परंतु, स्त्रियांनी केलेल्या कामापेक्षा पुरुषांनी केलेल्या अर्थार्जनाला जास्त महत्त्व दिलं जातं.
युगानुयुगे घरातील जबाबदारी स्त्रीची आणि बाहेरील प्रपंच अर्थात अर्थार्जनाचा सहित पुरुषाचा असा परिपाठ चालत आलेला आहे. हे मुळात त्या काळात ठरविण्याचे कारण म्हणजे रूढ झालेली *"चूल आणि मूल "ही परंपरा. वैदिक शास्त्रातील 'शिव' नावाची संकल्पना यांत्रिक उर्जा शारीरिक कार्यासाठी अधिक उपयुक्त होती; तर 'शक्ती' नावाची गतिज ऊर्जा पालन-पोषण आणि इतर भविष्यासाठी ठरविलेल्या कार्यास अधिक अनुकूल होती . शक्ती शिवाय शिव म्हणजे आत्म्याशिवाय शरीर (देह)म्हणून जगात एकच संस्कृती होती जिथे 'स्त्री' ही देवी संकल्पना शतकानुशतके रूढ झाली .पण गेल्या हजार वर्षात भारतीय समाज हे सर्व विसरला आणि सुरू झाले पुरुषी वर्चस्वाचे *यूग* . कुठलीही जबाबदारी न घेता आणि पालन-पोषण न करता पुरुषी वर्चस्व गाजू लागले .मात्र एकविसाव्या शतकात कुंभ राशीच्या प्रभावाखाली हे सगळे बदलू लागले. संस्कार आणि संस्कृती हा भारतीय समाजाचा पाया आहे चालीरीती आणि परंपरा या काळानुसार आकार घेऊ लागल्या. आजचा भारतीय समाज त्याच मंथनातून जात आहे. आणि म्हणूनच वयात आलेल्या नव युवकांना /युवतींना त्याची गतिशीलता समजून घेणे आवश्यक आहे त्याचा थेट परिणाम बदलत्या नातेसंबंधांवर होतो.
आजच्या युगात स्त्रियांची भूमिका आणि त्यांचा प्रवास पारंपरिक असल्यापासून ते व्यवसायिक होण्यापर्यंत असला तरी त्यांच्या पुरुष समकक्षांकडून काही आवश्यक समायोजन अपेक्षित आहे. कौटुंबिक व्याप ,अपेक्षा आणि या तडजोडी मुळे आजच्या नात्यात तणाव निर्माण झाला आहे .पण ,आजची स्त्री ही पैशासाठी पुरुषांवर अवलंबून राहिलेली नाही. म्हणूनच या आर्थिक स्वातंत्र्याने पुरुषांना कौटुंबिक जबाबदाऱ्या समानतेने वाटून घेण्यास भाग पाडले आहे जे सध्याच्या भारतीय समाजात अजूनही स्वीकारले गेलेले नाही.
संवाद हा वैवाहिक जीवनाचा सुंदर पैलू परंतु झालेला बदल अमान्य /अस्वीकार करणारा पुरुषी अहंकार संवादाचा बिघाड निर्माण करतो . परिणामी नातेसंबंधातील अनेक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अडचणींना सामोरं जावं लागू शकतं; याकडे लक्ष न दिल्यास मी विभक्त होणे किंवा घटस्फोट होऊ शकतात.
*विवाह म्हणजे एक पवित्र रेशीमगाठ.* हे जरी खरं असलं तरी बदलत चाललेली कुटुंब व्यवस्था म्हणजेच पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात होती परंतु काळानुरूप संयुक्त कुटुंबाची जागा विभक्त कुटुंबाने घेतली. म्हणायला ''छोटा परिवार सुखी परिवार" हे जरी बरं वाटत असलं तरी ,कोणी अनुभवी आणि जबाबदार व्यक्ती घरात नसल्यामुळे या जोडप्यांना त्यांच्या समस्या सोडविणे म्हणा किंवा जीवनावश्यक प्राथमिक गरजांची योग्य निर्धारण करणे म्हणा कठीण जाऊ लागले. उदाहरणार्थ: नोकरी आणि व्यवसायातील समन्वय असो किंवा मुलांच्या स्वास्थ शैक्षणिक समस्या. या कालचक्रा मध्ये स्त्रियांना आपल्या पुरुष समकक्षांना खऱ्या अर्थानं समजून घेणं .कुटुंब आणि मुलांना प्राधान्य देऊन अपेक्षा संतुलित करणे शहाणपणाचे ठरेल.
भारतीय कार्य संस्कृती बदलली! परिस्थिती बदलली तशीच गतीही बदलली. अगदी साधे उदाहरण बघायचे म्हणजे आपण भारतीयांनी दुपारच्या जेवणापासून ते झोपेपर्यंत पाश्चिमात्यांचे अनुकरण केले आहे. याचाच अर्थ बिना विश्रांती दिवसाला भरपूर तास काम करणे ,भरपूर प्रवास करणे ,कुटुंबापासून दूर राहणे अंतिमतः या सर्व गोष्टी नातेसंबंधात ताण आणू शकतात आणि अपेक्षा निर्माण करतात ज्या बऱ्याचदा पूर्ण होत नाहीत. त्यामुळे नातेसंबंधातील पुरुषांनी या वस्तुस्थितीची जाणीव ठेवली पाहिजे की आज स्त्रिया त्यांच्या बरोबर समान भागीदार आहेत .केवळ घरगुती जबाबदारी वाटून घ्यायचा नाही तर आर्थिक आणि शैक्षणिक जबाबदारीत त्यांना समान दर्जा *बहाल* करायचा आहे. तात्पर्य - जेव्हा अहंकारा शिवाय तडजोड बांधिलकी सहवास आणि संवादाची निवड करणे आवश्यक असते तेव्हा उत्तम सुवर्णमध्य गाठून कुटुंब , संस्कृती , शिक्षण आणि संगोपन यासारखे घटक कौटुंबिक गतिशीलता संतुलित करण्यात आणि नात्यांमधील दैनंदिन तणाव कमी करण्यात मोठी भूमिका बजावतात.
याच काही कारणांसाठी आम्ही सुशिक्षित आणि व्यावसायिक दृष्ट्या योग्य व्यक्तींना एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न *केदार* मार्फत करीत आहोत. ज्यांचे शिक्षण संस्कार ही काहीसे सारखेच आहेत जेणेकरून त्यांचे नाते इतरांप्रमाणेच काळाच्या कसोटीवर टिकू शकेल.
केदार च्या ब्लॉग टीम कडून आम्ही सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो . आणि आमची टीम सदस्यांची सेवा करण्यास उत्सुक आहे.