वैवाहिक वेबसाइट्स- जोडीदार(सोलमेट्स) चा शोध घेताना – केदार चे मनोगत
भारतात 1000 पेक्षा जास्त मॅट्रिमोनी साइट्स आहेत ज्या पालकांना आणि संभाव्य वधू आणि वर यांना भरपूर पर्याय देऊन आधुनिक विवाह व्यवस्था करण्यात मदत करतात. यात असंख्य मराठी वैवाहिक वेबसाइट्सचा समावेश आहे - जणू काही एक विश्वच , ह्याचा केदार हि एक भाग आहे. असे अनेक पर्याय समोर दिसल्यावर ,मग प्रश्न पडतो तो - कोणत्या प्रकारच्या वेबसाइट ला प्राधान्य द्यायचे आणि कोणाला नाही ?
कोणत्या वेबसाइट्सना प्राधान्य द्यावे:
केदारवर नोंदणी केलेल्या व्यक्तींसोबतच्या आमच्या अंतर्गत सर्वेक्षणात,लोकांकडून आलेली एक तक्रार, ती म्हणजे- इतर वेबसाइट्स ऑफर करत असलेल्या “नॉन-पर्सनलाइझ सेवा. त्या वेबसाइट्सवरील उमेदवारांची धड न केली गेलेली पडताळणी, त्यामुळे अपेक्षित उमेदवार ना सापडणे”. त्यामुळे प्रश्न उरतो-
- तुम्ही कोणत्या प्रकारच्या वेबसाइट्सवर नोंदणी करावी.
-
तुमच्या विशिष्ट गरजा पूर्ण करणाऱ्या वेबसाइट्सवर जावे.
-
उमेदवारांच्या संख्ये पेक्षा त्यांच्या गुणवत्तेला महत्व देणाऱ्या वेबसाइट ची निवड करावी
-
अश्या वैवाहिक पोर्टलवर नोंदणी करा जे उमेदवारच्या प्रोफाइलची तपासणी तर करतातच त्याच बरोबर आपल्याला अपेक्षित असलेले उमेदवार हि आपल्याला मिळवून देतात.
-
अश्या विवाहविषयक वेबसाइट वर जावे ज्या तपासणी व्यतिरिक्त, इतर सवलती देखील प्रदान करतात - उदा. उमेदवार शोधण्याची सोपी पद्धत , ज्योतिषी द्वारे जन्म -लग्न कुंडली ची जुळवणी आदि.
केदार मराठी वैवाहिक वेबसाइट येथे, सुशिक्षित आणि व्यावसायिक दृष्ट्या शिक्षण घेतलेल्यांसाठी,
केवळ उमेदवारांच्या गुणवत्तेवर तर लक्ष केंद्रित करतोच , त्याचबरोबर प्रत्येक प्रोफाइलची वैयक्तिकरित्या तपासणी सुद्धा करतो आणि समान लक्ष आणि महत्त्वाकांक्षा असलेल्या संभाव्य जोडीदार निवडण्यासाठी संपूर्ण संधी सुद्धा प्रदान करतो .
परंतु वेबसाइटकडून काय अपेक्षा करावी- हे इतकेच मर्यादित नाही तर भारतातील निर -निराळ्या उप-संस्कृती, आपल्या बाबतीत, मराठी विवाह उपसंस्कृतीचा आपला एक निराळा गोडवा व सुगंध आहे.
परंतु काही सामान्य नियम आहेत जे आपल्यापैकी प्रत्येकाने पाळले पाहिजेत –
1.- संभाव्य जोडीदार निवडण्यासाठी किंवा भेटण्यासाठी तुमच्या पालकांना तुमच्यावर दबाव आणू देऊ नका - अनेकदा, पालक ऑनलाइन पोर्टलवर, विशेषत: मॅट्रिमोनी साइट्सवर स्थळ शोधतात आणि त्यांच्या मुलांना अशा लोकांशी भेटण्यास भाग पाडतात जे त्यांच्या दृष्टी ने योग्य वाटतात . हे कधी -कधी बरोबर हि असू शकते, परंतु बहुतेकांसाठी, त्यांनी विचारपूर्वक पुढे जाणे आवश्यक आहे. जीवनसाथी निवडताना कौटुंबिक भूमिका अत्यंत महत्त्वाची असली, तरी अंतिम निर्णय लग्न करणाऱ्यांच्या हातात असतो आणि तो निर्णय दबावाशिवाय घ्यावा.
2. वाईटातून चांगले फिल्टर करा – सामान्यतः कुठल्याही वैवाहिक वेबसाईट वर हे अपेक्षित असते कि मुलं -मुलींची योग्य ती पडताळणी केली जाईल . अश्या अनेक वैवाहिक वेबसाइट्स, मराठी विवाह किंवा इतर आहेत, जिथे असे मुलं आहेत ज्यांना, “मुलींशी लग्न करण्याचा कोणताही हेतू नसताना हि फक्त त्यांच्याशी बोलायचेच असते “ . हे बऱ्याच दा अश्या काही पोर्टल्स वर दिसून येते जेथे उमेदवारांची योग्य पडताळणी केली जात नाही , किंवा बरोबर तपासणी केली जात नाही .केदार वर तुमच्या ह्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली जाते. केदार ही काळजी नेहमीच घेते कि मुलं -मुलीं चे उच्च शिक्षणा बरोबरच सुसंस्कारित असणे हि गरजे चे असते
3. लोकांना प्रत्यक्ष भेटल्याशिवाय तुमच्या आशा /अपेक्षा ठरवू नका - ज्या वेबसाइट्सवर नोंदणीकृत आहेत ,जेथे योग्य पार्श्व भूमी ची तपासणी न करता सहज सर्वांनाच स्थळे शोधण्याची मुभा मिळते अश्या ठिकाणी, ते स्वतःला कसे सादर करतात त्यापेक्षा विरुद्ध माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्या ऑनलाइन फोटो आणि संदेशांमध्ये वैयक्तिक माहितीची देवाणघेवाण करण्यापूर्वी थोडी प्रतीक्षा करा, उदा.फोन नंबर तसेच त्यांना वैयक्तिकरित्या भेटण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आप-आपसात बोलणी करा . आणि नंतर भेटी चा निर्णय घ्या
4. निर्णय घेण्याची घाई करू नका : जोडीदार शोधताना आपल्याला अपेक्षित स्थळ मिळत नसेल तर अनेक कारणांपैकी एक कारण- आपण ठरविलेले निकष असू शकतात . अश्या वेळेस हा शोध घेण्यास थोडा वेळ लागू शकतो . सरते शेवटी आयुष्यात थोडीफार तडजोड बऱ्याचदा करावी लागते . तडजोड करताना काळजी घ्या. तुमची थोडीशी चूक तुम्हाला आयुष्य भराला त्रासदायक ठरू शकते. म्हणूनच “यंदा कर्तव्य आहे” म्हणून अनेकानेक वेबसाइट्स वर रजिस्टर केल्याने अपेक्षित परिणाम मिळतीलच असे नाही .
“शेवटी लग्न लवकर ठरण्यापेक्षा लग्न टिकणे महत्वाचे.”
5. आपली मते स्पष्ट ठेवा : जुळवणी करताना आपली मते नेहमी स्पष्ट ठेवा . नेमके आपल्याला कोणत्या व कश्या व्यक्तीला भेटायचे आहे, ह्याबद्दल स्पष्ट असणे गरजेचे आहे
6. खंबीर राहा: पहिल्या काही प्रयत्नांमध्ये तुम्हाला योग्य जुळणी आढळली नाही, तर निराश होऊ नका. अनेक वेळा अनेक जणांशी गाठी भेटी झाल्यावर आणि आपल्याला पटत नसल्यास तेथेच थांबणे योग्य , परंतु खचून जाऊन वाटेल ती तडजोड करून त्यांच्या वाटेला जे येईल त्यावर तोडगा शोधून कसेही करून लग्न जमविणे योग्य नव्हे. असे करणे सुखी जीवना करिता धोकादायक ठरू शकते.
7. व्यावहारिक व्हा: जर तुम्ही स्वतःसाठी मोठ्या अपेक्षा ठेवल्या असतील, तर सहज निराश होऊ नका. तुम्हाला ज्या निवडी करायच्या आहेत त्याबाबत व्यावहारिक व्हा. कुटुंब आणि मित्रांचे डोळे झाकून ऐकण्याऐवजी, स्वतःचे निर्णय घ्या आणि मित्र, कुटुंब किंवा इतरांचा तुमच्यावर प्रभाव पडू देऊ नका. कारण लग्न तुम्हाला निभवायचे आहे ,आयुष्य तुमचे आहे.
8. मन मोकळे ठेवा: बहुतेक लोक दिवास्वप्न पाहतात आणि लोकांना भेटण्यापूर्वी अनेक अनावश्यक अपेक्षा निर्माण करतात. तुम्ही वैवाहिक वेबसाइटवर लोकांना भेटता तेव्हा, तुम्ही लोकांना प्रत्यक्ष भेटण्यापूर्वी तुमच्या पूर्वकल्पित कल्पना सोडून द्या. मोकळे मन असणे आणि सुसंगत वाटणाऱ्या प्रत्येकाला भेटणे केव्हाही उत्तम.
केदार ने ह्याच करिता प्रयत्नपूर्वक, समाजातील एका विशिष्ट वर्तुळात, विशिष्ट समान मूल्य प्रणाली, ध्येये आणि महत्त्वाकांक्षा असलेल्या संभाव्य वधू आणि वर यांना भेटण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. केदार ला पूर्ण आशा आहे कि आम्ही करत असलेल्या ह्या कार्या मुळे आमच्या सदस्यांना त्यांच्या संभाव्य जोडीदार निवडण्यासाठी मार्ग सुलभ होईल.