सुखी वैवाहिक जीवना साठी नाते जपावे कैसे

Published Date : May 05, 2021

केदारच्या प्रवासात नित-नवीन नाती जुळत आहे व नात्यांच्या ह्या कनेक्शनच्या ऋणानुबंधाची कोवळी कळी फुलून टप्पोरी फुले झाली आहेत। ह्या प्रवासात आम्ही फक्त दोन मन जुडवण्या साठी सोबती नाही तर त्या दोघांच्या  वैवाहिक जीवनाचा प्रवास एक-दुसऱ्यांची मन राखून, त्यांना जपून, समजून ह्या प्रवासाला अनुभवाच्या सूत्रात पेरण्या साठी सदैव आहोतच तुमचे नातेवाईक म्हणून। नाती माणसाच्या जीवना सोबत बांधलेल एक प्रेमळ बंधन। विश्वास, तडजोड, थोड़ आंबट, थोड़ गोड आणि भरपूर प्रेमान सजलेल्या ह्या नात्यांच्या प्रवासात वर किव्हां वधूच्या अल्हड़पणाला  जेव्हां अनुभव, जवाबदारी आणि समजदारीची साथ मिळते, तेव्हां सर्व संमतीने जुडलेल हेच नात नवरा आणि बायको ह्या नावाने ओळखले जाते। ह्या वैवाहिक नात्यांची फुलवारी सजवून अवघ्या कुटुंबाला सुगन्धित करणे सहज सोप्पे नाही। कधी ह्याला नाजुक फुलांसारखे जपावे लागते तर कधी कसोटीतून  निघताना उपाय शोधून मार्गस्थ व्हावं लागत । विभिन्न मतांची धागी जोडून स्वतःच वेगळ जग निर्माण करताना अडचण ही होणारच, आपले आप्त-इष्ट, वडील माणसांना सोबत घेऊनच व त्यांच्या मताप्रमाणे आपल्या जोडीदारा सोबत वचनांची पाउले टाकून ह्या गोडम्बी संसाराला एक नवीन चव देण्यात तुम्ही नक्कीच सक्षम होणार। 

 

भारतीय विवाहाचे सप्त बंधन हे फक्त नवरा बायको ह्या नात्यांनीच नाही फुलत, आपसी सामंजस्य, विश्वास आणि प्रेमा सोबत ह्याला कुरवाळते आईचे प्रेम, वडिलांची छत्रछाया, भाऊ-बहिणींची मस्करी आणि दोघांचे अथक प्रयास ह्या नात्यांच आयुष्यभर सिंचन करण्या साठी। असा हा दोन मनांचा एक संसार जीवनाच्या वळणावर येणाऱ्या मार्गाच्या प्रत्येक अडचणींना तोंड देत उजळून नक्कीच निघेल जेव्हां विश्वासा सोबत धैर्य, सांत्वना, सन्मान, थोड़ी पर्सनल स्पेस तर थोड़ फॅमिली टाइमच खत ह्या रोपट्याला भरभरून प्रेमा सोबत मिळेल। वेळ आणि प्रेम हे ह्या संसार रूपी रोपट्याला पाणी आणि सूर्याच्या सोनेरी किरणां प्रमाणे दर रोज मिळेल, तर ही नाज़ुक नात्याची बगिया फुलून निघेल। अगदी आपल्या अनुभवी आजी आजोबां सारखी। ही नात्याची पेरणी सुरु होती फक्त घरा पासून आणि जस रोपटं जपतो तसच मन ही जपावेत, ही शब्द अगदी जन्मघुट्टी सारखी प्रत्येकाच्या संस्कारात घोटून देण, हीच आपली जन्म संस्कृति आहे आणि केदार ह्याच संस्कृतिला अगदी आपल्या नियमा प्रमाणे जपत आहेत। संस्कार, शिक्षण आणि विश्वास हे आम्ही जोडलेल्या नात्यांच मूलाधार आहे।

Team Kedar