सुखी-वैवाहिक-जीवनाच्या-गुरुकिल्ल्या

Published Date : January 27, 2021

सुखी वैवाहिक जीवनाच्या गुरुकिल्ल्या

 

आपले वैवाहिक जीवन यशस्वी व्हावे असे प्रत्येकालाच वाटणे स्वाभाविक आहे परंतु असे घडताना बऱ्याचदा दिसतं नाही . आपल्या वैवाहिक जीवनाला  यशस्वी होण्यासाठी दररोज काही महत्वाच्या गुरुकिल्या केदार ने आपल्या सदस्यांच्या बरोबर झालेल्या चर्चा व त्यांचे अनुभव  ह्यातून खास तुमच्या करीत शोधून काढल्या आहेत

सुखी  व साफल्यपूर्ण  वैवाहिक जीवना करिता  फक्त वचनबद्धता  आणि प्रेम च नाही तर आनंदी आणि  यशस्वी  होण्याची प्रबळ  इच्छा शक्ती असणे ही महत्वाचे असते प्रेम, आदर व समर्पण ह्या भावनांच्या आधारावर जुळलेले विवाह हे यशस्वी होत असले तरीही ते जुळायलावेळहालागणारच ते काही लगेच किव्हा घाईने कधीच ठरू शकत नाही. टिकेल कसे ??

काळजी नको !! आपल्या कडे गुरुकिल्ली  आहे ना !! आपण जर त्या वापरल्या तर त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होणारच.
कागदावरजुळलेली पत्रिका आणि काळजावर जुळलेली पत्रिका ह्यात फरक असणारच.काळजावर जुळलेली पत्रिका म्हणजेच ना जुळण्याऱ्या गुणांशी दोघांनीही जुळवून घेणे , अशी पत्रिका जेव्हा जुळते  तेच खरे पत्रिका जुळविणे नाही काय?नाते-संबंध टिकविणे म्हणजे दुधारी तलवार . जरा चुकलात कि लगेच कापले जाता म्हणूनच जरा जपून.. . ह्याला जर अनुभव व संयमाची साथ मिळाली तर हेच  बहरून  उठतात आणि म्हणूनच खालील गोष्टी जर प्रामाणिकपणे  पाळल्या  गेल्या तर पुढेसर्वच रसमय ,संगीतमयच  असण्या पासून कोणीच थांबवू शकत नाही.चला तर मग ... बघूया काय आहेत त्या गुरुकिल्ल्या

नाती घट्ट करण्याऱ्या गुरुकिल्या      काही  मूलभूत आणि अनिवार्य,  गोष्टी

१. परस्परांवर चा विश्वास

२  .प्रेम

३. अर्पण/  समर्पण भावना

४. आत्मविश्वास

5. स्वभावाची लवचिकता

6. मृदुभाषी  असावे

7. निष्ठा

8. निरपेक्षता

नाती खिळखिळी करण्याऱ्या किल्ल्या पण आहेसच हो,त्यांच्या पासून सावधपणे स्वतः ला  वेळीच वाचविणेमहत्वाचे

अनावश्यक व मुळापासून   सोडून देण्यायोग्य  गोष्टी ,जितक्या लवकर जमेल तितकेच चांगले

1.अहंकार

2. व्यर्थाभिमान

3. प्रत्येक गोष्टीतला मीपणा

4. सतत असण्याऱ्या खूप अपेक्षा

5.अविश्वास

6.सतत  असुरक्षितता ची भावना

7स्वभावातील उद्धटपणा

     आपले आयुष्य हे चांगल्या तशाच ना आवडण्याऱ्या गोष्टीनी परिपूर्ण आहे , त्यामुळे त्यातून पळवाट काढत व दुसऱ्याला दोष देत पुढे जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यापेक्षा, आहे तसे स्वीकारण्याची तयारी ठेवली तरच समोरचा मार्ग स्पष्ट व स्वछ  दिसतो  दुसरी महत्वाची गोष्ट अशी कि पहाड चढतानाच कष्ट करावे लागतात पहाड उतरणे सोपे असते .

 

मग आपण ठरवायचं  आपला मार्ग.  सर्व किल्ल्या आपल्याच हाती आहेत कुठली वापरायची ह्याचा निर्णय हि आपलाच असणार.

 

Team Kedar